Apoorva Hiray : नाशिकमध्ये अजितदादांना मोठा धक्का,अपूर्व हिरे 'कमळ' हाती घेणार!
Apoorva Hiray : नाशिकमध्ये अजितदादांना मोठा धक्का,अपूर्व हिरे 'कमळ' हाती घेणार!
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इन कमिंग सुरूच आहे बडगुजर यांच्यां पाठोपाठ आता। माजी आमदार अपुर्व हिरे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रबेश करत आहेंत, सुधाकर बडगुजर यांच्यां प्रवेशाला ज्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला त्याच्याच माध्यमातून अपूर्व हिरे यांचा प्रवेश होत आहे, गिरीश महाजन यांनी 100 प्लस चा नारा दिल्यानं प्रवेश सोहळे होत असून येत्या काही दिवसात आणखी पक्ष प्रबेश केले जाणार असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केल्यनंतर विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर टीका ही झाली होती. मात्र आता पुन्हा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेश होत असून विरोधक ठेवायचा नाही हे लक्ष भाजपने ठेवले आहे, अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाच्या आदल्याच दिवशी हिरेच्या विरोधात बेकायदेशीर कर्ज घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानं वादाची किनार देखील या प्रवेशाला लागली आहे. आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी