Nashik Crime:10 लाखांची खंडणी घेताना कृषी सहाय्यक महिलेला मुलासह अटक,आरोपींना 3 दिवसांची पोलिस कोठडी
बलात्काराचा गुन्हा दाखल करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या कृषी सहाय्यक महिलेला मुलासह अटक केली आहे. संबंधित महिलेने दिंडोरी इथल्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पिठाच्या विश्वस्तांकडून खंडणी मागितली होती. सारिका सोनवणे आणि मोहित सोनवणे अशी आरोपींची नावं आहेत. गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.