Nashik : येवल्यापाठोपाठ लासलगावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी, प्रवेश बंदीमुळे नेत्यांची पंचाईत
Continues below advertisement
नाशिकमधील येवल्यापाठोपाठ आता लासलगावातही राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात 'प्रवेश बंदी' असे डिजिटल फलक लावण्यात आले आहे. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष, मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यास गावात प्रवेश नाही असा उल्लेख या फलकावर करण्यात आला आहे.
Continues below advertisement