Advay Hiray Join BJP Nashik : हिरेंचे हुर्रे! ठाकरे सेनेचे अद्वय हिरे भाजपत जाणार

Continues below advertisement

Advay Hiray joins BJP: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांसाठी सोमवारी (ता. 17) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी आपले महत्त्वाचे ‘पत्ते’ उघड केले असताना नाशिकमध्ये मात्र मोठा राजकीय धक्का बसला आहे.  ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. 

Advay Hiray joins BJP: नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; अद्वय हिरे भाजपमध्ये

उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी अखेर आपल्या राजकीय भूमिकेत मोठा बदल करत शिवसेनेचा निरोप घेतला आहे. हिरे आज मंगळवारी (ता. 18) मुंबईतील भाजप कार्यालयात अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या, त्या अखेर स्वतः हिरे यांनीच पुष्टी करत या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले. हिरे यांच्या निर्णयामुळे नाशिकच्या राजकीय समीकरणात भाजपची ताकद आणखी वाढणार असून उद्धव ठाकरे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola