Aaditya Thackeray at Nashik : शिवसेनेचा नाशिकचा ढासळणारा गड सांभाळण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात
शिवसेनेचा नाशिकचा ढासळणारा गड सांभाळण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरणार आहेत. येत्या सोमवारी आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून, ग्रामीण भागांतील जनतेशी ते संवाद साधणार आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात ठाकरे आणि शिंदे गटात जिथं राडा झाला होता, त्या देवळालीत आदित्य ठाकरे सभा घेणारेत.