Nashik Accident : अवैध वाहतूक प्रकरणी क्रूझरचालकावर गुन्हा दाखल, दोघांचा मृत्यू

नाशिकच्या पेठ तालुक्यातील अवैध वाहतूक प्रकरणी क्रूझरचालक पुंडलिक गाडर याच्यावर पेठ पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमवारी सायंकाळी पळशी ते चिखली गावादरम्यान भरधाव वेगात असणाऱ्या क्रूझरचे ब्रेक फेल झाल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्याजवळ कोसळली आणि यात दोघांचा मृत्यू झाला होता... विशेष म्हणजे १३ प्रवासी क्षमता असलेल्या या क्रुझरमधून 35 जण प्रवास करत असल्याचा आरोप जखमी झालेल्या प्रवाशांनी केला.य,,. दरम्यान क्रूझर अपघातातील दोघांच्या मृत्यूला आता प्रादेशिक परिवहन विभागालाच जबाबदार पकडायचे का ? असा सवाल उपस्थित होतोय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola