Nasik IT Raid: सात बांधकाम व्यावसायिकांकडे सापडली 3333 कोटींची बेहिशेबी मालमत्ता
Continues below advertisement
नाशिक शहर व परिसरातील सात बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या पथकाने गेले सहा दिवस छापे टाकले. मंगळवारी ही कारवाई संपली. यात तब्बल ३ हजार ३३३ कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले.,तर साडेपाच कोटींची रोकड व दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. ‘दिव्य मराठी’ या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे. आयकर विभागाची महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितलं जातंय. नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर कार्यालयातील २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचं पथक दिवस- रात्र ही कारवाई करत होतं. ९० हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या या पथकांनी बिल्डरांची ४० ते ४५ कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर छापे टाकले.
Continues below advertisement