भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू, 300 खाटांची व्यवस्था, शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन

Continues below advertisement

नाशिक महानगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेस  आणि भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून नाशिकमध्ये कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आलंय, मनपाच्या मीनाताई ठाकरे स्टेडियम मध्ये उभारण्यात आलेल्या या 300 खाटांच्या सेंटरचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करणयात आलं, शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजन बेड नागरिकांना मिळत नसल्याने ऑक्सिजन अभावी अनेकांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी पुढाकार घेतला तर यंत्रणेवरचा ताण काही प्रमाणात कमी होईल, राज्याबरोबरच देशातील परिस्थिती गंभीर होत असल्याने लॉकडाऊन लागू करावा असा पुनरुच्चार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram