Nashik Gas Geyser Blast | गॅस गिझरच्या स्फोटात 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू, गॅस गळती झाल्याने स्फोट
नाशिकमध्ये गॅस गिझरचा स्फोट होऊन एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. श्वास गुदमरल्यानं गौरव पाटील याचा मृत्यू झाला आहे. सिडको परिसरातील दौलतनगर मधील काल दुपारी ही घटना घडली. गॅस गळतीमुळे हा घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गौरवला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.