सप्तश्रृंगी मंदिर 5 महिन्यांपासून बंद, अर्थकारण ठप्प, अनेकांवर गाव सोडण्याची वेळ
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता अद्याप मंदिरे खुली करण्यात आलेली नाहीत. साडेतीन शक्तीपिठांपैकी आद्य शक्तीपिठ असलेले वणीचे सप्तश्रृंगी देवी मंदिर देखिल 5 महिन्यांपासून बंद आहे, सप्तश्रृंगीच्या या नांदूरी गडावर साधरणतः 600 छोटे मोठे व्यावसायिक असून येणाऱ्या भाविकांवरच इथले सर्व उद्योगधंदे अवलंबून असल्याने गावचे अर्थकारण पूर्णतः ठप्प झाले आहे. फुलविक्रेते, पूजासाहित्य-प्रसाद विक्रेते, हॉटेल्स-लॉजेस, टॅकसीचालक अशा सर्वांचाच यात समावेश आहे. धक्कादायक म्हणजे उपासमारीची वेळ आल्याने अनेकांना गाव सोडून जाण्याचीही वेळ आली असल्याच गावकरी सांगत असून एकट्या मंदिर ट्रस्टला अंदाजे साडेपाच कोटी रुपयांचा फटका बसलाय.