Nashik Potholes | अजितदादा नाशकात येणार म्हणून रस्ते चकाचक! बांधकाम विभागाला खडबडून जाग!
Continues below advertisement
एखादा मंत्री त्यातही अजित पवारांसारखा नेता जर एखाद्या शहरात दाखल होणार असेल तर प्रशासन कशाप्रकारे कामाला लागते याच उदाहरण आज नाशिकमध्ये बघायला मिळतंय. गंगापूर धरणाजवळील ग्रेप रिसोर्टमध्ये आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार शासकीय अधिकाऱ्यांची कोरोनाबाबत आढावा बैठक घेणार आहेत त्यानंतर गंगापूर रोडमार्गे ते सोमेश्वर जवळील एका लग्न सोहल्याला हजेरी लावणार असल्याने दुपारपासून बांधकाम विभागाकडून हा रस्ता चकाचक केला जात असून रस्त्यावरील खड्डे आज अचानक बुजवले जातायत.
खरं तर पावसाळ्यानंतर या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून अनेक ठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत, वाहनचालकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय अनेक वेळा याबाबत बांधकाम विभागाकडे नागरिकांनी तक्रारी देखिल केल्या होत्या मात्र हे काम काही मार्गी लागत नव्हते.
Continues below advertisement