Rupee Dispute Attack | १० रुपयांवरून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, Nashik मध्ये खळबळ
नाशिकच्या भद्रकाली परिसरातील नानावाली गोठ्याजवळ १० रुपयांच्या वर्गणीवरून झालेल्या वादातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने गळ्यावर वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याची प्रकृती अधिकच गंभीर असल्याचे सांगितले. सध्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असून, भद्रकाली पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.