Nashik Book Rally | नाशिकमध्ये ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाच्या दशकपूर्ती निमित्ताने बुक मार्च | ABP MAJHA
Continues below advertisement
नाशिकमध्ये ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाच्या दशकपुर्ती निमित्ताने बूक मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये स्थानिक नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग बघायला मिळाला. कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून निघालेल्या या मार्चमध्ये कवी किशोर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे यांनी या बूक मार्चचं आयोजन केलं होतं. आपल्या आवडत्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची प्रत हाती घेत शालेय विद्यार्थ्यांनी या मार्चमध्ये सहभाग घेतला.
Continues below advertisement