Nashik : नागा साधुंच्या रुपात येऊन भामट्यांनी वृद्धांना लुटलं
Continues below advertisement
खरं तर धार्मिक नगरी सोबतच कुंभनगरी म्हणून नाशिकची ओळख. मात्र याचाच फायदा आता चोरटे घेऊ लागले आहेत. चक्क नागासाधूच्या रूपात आलेल्या चोरांनी दोन वयस्कर नागरिकांच्या सोनसाखळी लंपास केल्या असून चोरटे अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. विशेष म्हणजे चोरांनी संमोहन केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय.
Continues below advertisement