Nashik : नाशकात नेत्यांच्या मुलाला विवाहसोहळा,सत्ताधाऱ्यांनाच पडला कोरोनाचा विसर : ABP Majha

एकीकडे राज्यावर निर्बंधांचं सावट आहे,  मात्र दुसरीकडे लोकप्रतिनिधीच सरकारने घालून दिलेल्या नियमांना पायदळी तुडवताना दिसून येतंय. राज्यात असे एकदोन नव्हे तर चार सोहळे गेल्या दोन दिवसांत समोर आलेत. नाशिकमध्ये बुधवारी सायंकाळी कन्नड विधानसभेचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. तर नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुलीचा विवाह सोहळा गंगापूर रोडवरील गीता लॉन्समध्ये पार पडला. या दोन्ही सोहळ्याना वऱ्हाडी मंडळी आणि नेतेमंडळीनी तुफान गर्दी केली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola