MahaShivratri | त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तांची मांदियाळी, भाविकांच्या मोठ्या रांगा
Continues below advertisement
महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय. भगवान शंकराला बेलफुल वाहण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत गर्भगृहात जाऊन दर्शन घेता येत होते. मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच महाशिवरात्रीला गर्भगृहात प्रवेश देण्यात येत नाही.
Continues below advertisement