Satpuda Strawberry Special Report : योग्य नियोजन, कठोर परिश्रम; सातपुड्याच्या कुशीत फुलली स्ट्रॉबेरी

Continues below advertisement

Satpuda Strawberry Special Report : योग्य नियोजन, कठोर परिश्रम; सातपुड्याच्या कुशीत फुलली स्ट्रॉबेरी

मनात काही नवीन करायची उमेद राहिली तर त्याला शिक्षणाचाही अडथळा येत नाही सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या अशिक्षित तरुणाने स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग केला असून अवघ्या तीन महिन्याचा हंगामात एका एकरातून लाखोंचे  उत्पादन घेतले आहे चला तर पाहूया त्याचा स्ट्रॉबेरी शेतीचा एक खास रिपोर्ट.... सध्या शेती परवडत नाहीत आता शेतीत काही राहिलं नाही अशा गोष्टी अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतात पण मात्र अशा सगळ्या गोष्टींना फाटा देत नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगात वसलेल्या डाब या गावातील एका अशिक्षित शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून दाखवली आहे. शेतकरी धिरसिंग फुसा पाडवी यांचं शिक्षण आपण विचारलं तर ते आहे शून्य हो धिरसिंग हें अशिक्षित असून ते बालपणापासून कोणत्याच शाळेत शिकलेले नाहीत. पण त्यांनी जे प्रयोग आपल्या शेतीत केले ते उच्चशिक्षितांना जमणार नाही आणि त्यातून एकेरी 6 लाख रुपयांचे उत्पन्न ते घेत आहेत. 
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram