Nandurbar : Sarangkheda येथील चेतक फेस्टिवलमध्ये अश्व क्रीडा स्पर्धा, तयारी पूर्ण
अश्व पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा चेतक फेस्टिवल मध्ये यावर्षी पहिल्यांदाच आश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी लागणारे धावपट्टी आणि इतर तयारी अंतिम टप्प्यात असून आयोजकांच्या वतीने चेतक फेस्टिवल ची तयारी करण्यात येत आहे . फेस्टिवल मध्ये यावर्षी अश्व सौंदर्य स्पर्धा, अश्व नृत्य स्पर्धा,घोड्यांचा रेस ,तसेच अश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबत घोडेबाजाराची तयारी पूर्ण झाली असून देशभरातून 900 पेक्षा अधिक घोडे आतापर्यंत विक्रीसाठी दाखल झाले आहेत. या वर्षी घोडे बाजारात तीन हजार पेक्षा अधिक घोडे दाखल होण्याचा अंदाज जयपालसिंह रावल यांनी व्यक्त केला आहे