Nandurbar News : नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, राजेंद्र गावित यांच्या बंधूंचा पक्षाला रामराम

Continues below advertisement

नंदुरबार : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावरच नंदुरबारमध्ये (Nandurbar News) भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांचे बंधू भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित (Rajendrakumar Gavit) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत शहादा-तळोदा मतदारसंघातून (Shahada-Taloda Assembly Constituency) निवडणूक लढवणारच, अशी घोषणा भाजप नेते राजेंद्रकुमार गावित (Rajendrakumar Gavit) यांनी केली होती. त्यानंतर आता राजेंद्रकुमार गावित यांनी राजीनामा दिला आहे. 

राजेंद्रकुमार गावित कुठल्या पक्षात जाणार?

राजेंद्रकुमार गावित हे शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता राजेंद्रकुमार गावित नेमकं कुठल्या पक्षात जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजेंद्रकुमार गावित निवडणूक लढणार असल्यामुळे आमदार राजेश पाडवी यांची डोकेदुखी वाढली आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षाच्या राजीनामा दिल्याने भाजपाला मोठं खिंडार पडलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram