Nandurbar Scary Driving : पूल नाही, पुराच्या पाण्यातूनच नदी ओलांडली; ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास
Nandurbar Scary Driving : पूल नाही, पुराच्या पाण्यातूनच नदी ओलांडली; ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास तळोदा तालुक्यातील बोरवाण गावात नदीला पूल नसल्याने येथील नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या गावाला पावसाळ्यात पर्याय रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होत असून गरोदर महिला विद्यार्थी आणि वयोवृद्धांना जीवघेणा संघर्ष करावा लागत आहेत. या जीवघेण्या प्रवासामुळे पुराच्या पाण्यातून अनेकांना आपला जीव देखील गमावा लागू शकतो मात्र या गावांना जाण्यासाठी दुसरा पर्याय रस्ता नसल्याने जीव धोक्यात घालून आदिवासी बांधव प्रवास करताना पाहायला मिळत आहेत गावकऱ्यांच्या मागणीनुसार बोरवान नदीवर पूल मंजूर करण्यात आलेला आहे पण त्या मंजुरीला अनेक महिने उलटून देखील प्रत्यक्षात पुल बांधणीला सुरुवात न झाल्याने पावसाळ्यात या गावकऱ्यांना आता मोठ्या समस्याला सामोरे जावे लागत आहेत जर बोरवणीचा नदीला मोठा पूर आला तर त्या परिसरातील दहा गावांच्या संपर्क हा तुटत असतो आणि त्या ठिकाणी आरोग्याच्या देखील समस्या समोर येत असतात अनेक महिने उलटून देखील या पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यामुळे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले असून गावाची समस्या न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा बीरसा आर्मीच्या वतीने देण्यात आलेला आहे....