Nandurbar : सारंगखेडा घोडे बाजारात 10 वर्षातील विक्रमी उलाढाल, घोडे विक्रितून चार कोटींची उलाढाल
Nandurbar : सारंगखेडा घोडे बाजारात 10 वर्षातील विक्रमी उलाढाल, घोडे विक्रितून चार कोटींची उलाढाल
नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात यावर्षी गेल्या १० वर्षातील विक्रमी उलाढाल पाहायला मिळाली. यंदा एक हजार घोड्यांच्या विक्रीतून चार कोटींचा व्यवहार झालाय. दत्तजयंती पासून सुरू होणाऱ्या या बाजारात यावर्षी देशभरातून तीन हजारापेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल झालेत. ही यात्रा आणखी काही दिवस सुरुच राहणार आहे. दर वर्षी यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात मोठया प्रमाणात उलाढाल होत असते, यावर्षी जवळपास पाच कोटींचा टप्पा पार करेल असा विशास चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी व्यक्त केला आहे.