Nandurbar Papaya : पपई उत्पादक शेतकरी अडचणीत, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव : ABP Majha

देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे.नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जात असते यावर्षी असलेल्या दुष्काळी परिस्थितीतही पपई उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पपई बागा जगवल्या होत्या मात्र पावसानं दिलेली हुलकावणी,त्यानंतर अतिवृष्टी सारखा झालेला पाऊस.. यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय.  पपईवर पडलेल्या या रोगामुळे आता पपईच्या बागा उध्वस्त झाल्यात. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास गेल्यानं बळीराजासमोर आव्हानांचा डोंगर उभा ठाकलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola