Nandurbar : मंत्र्यांना दौऱ्यासाठी वेळ पण शेतकऱ्यांसाठी नाही, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
Nandurbar : मंत्र्यांना दौऱ्यासाठी वेळ पण शेतकऱ्यांसाठी नाही, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आली आहे. कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार नसल्याची स्थिती आहे. सरकारने कापसाला जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी भावात व्यापारी खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. मंत्र्यांना दौरे करण्यास वेळ आहे, एकमेकांवर टीका करण्यास वेळ आहे, मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. नंदुरबारमध्ये कापसाला ६३३० ते ७५०० पर्यंत दर मिळत आहे. सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपाययोजना केल्या नाही तर आत्महत्या वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे .