Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदुरबारमध्ये हेलिकॉप्टरमधून डॅशिंग एन्ट्री ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे प्रथमच नंदुरबार जिल्ह्यात जात असल्यानं या दौऱ्याला विशेष महत्व आहे. या दौऱ्यात शिंदे गटाचा मेळावाही होणार आहे. या मेळाव्यातून शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी शिंदे गटानं केलीय. मेळाव्यासाठी पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आलाय..