Nanded Video : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण, व्हीडिओ व्हायरल

Continues below advertisement

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण होत असल्याचा व्हीडिओ नांदेड जिल्ह्यातील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ नांदेडच्या इस्लापुरमधील पोलीस स्टेशनमधला असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदकडून करण्यात येतोय.. यात इस्लापुर पोलिसांकडून विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना अर्धनग्न करून पट्ट्यानं बेदम चोप दिल्याचा आरोप करण्यात आलाय.. अवैधरित्या गायींची तस्करी करणाऱ्या वाहनांना अडवण्याचा प्रयत्न विहीपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं सांगण्यात येतंय... यासंदर्भात विहिपच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना फोनाफोनी केल्यानंतर अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, असं विहिपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय...दरम्यान, पोलिसांनी राग मनात ठेवून विहिपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली, असाही दावा कार्यकर्त्यांनी केलाय... याप्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांना देखील पत्र लिहिण्यात आल्याचं विहिपकडून सांगण्यात आलंय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram