Punjabi Wedding : नवरीला लग्न मंडपात आणताना छत्र वापरू नये , पंचप्यारे साहिबानी घेतले नवे निर्णय
नांदेडचे तख्त सचखंड श्री हुजूर साहिब येथील पंचप्यारे साहिबानी शिख धर्मातील लग्नाबाबत तीन निर्णय घेण्यात आले आहेत. लग्नात नवरी मुलीने परिपूर्ण पंजाबी सूट आणि सलवार परिधान करावे, लग्न पत्रिकेत सिंग आणि कौर नावाचा उल्लेख करावा , नवरीला लग्न मंडपात आणताना छत्र वापरू नये असे निर्णय घेण्यात आले आहेत. शीख धर्मात पंचप्यारे यांनी घेतलेल्या निर्णयाला धार्मिकदृष्ट्या खूप महत्व असून त्यांच्या या निर्णयाचे शीख धर्मातील नागरिकांनी स्वागत केले आहे.