ABP News

Rahul Gandhi on Nanded Case :BJP हजारो कोटी प्रचारावर खर्च करते,पण लहानग्यांच्या औषधांसाठी पैसे नाही

Continues below advertisement

नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, वेळेवर औषधांचा पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान या घटनेनंतर सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. पालकमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केलीय. दरम्यान नांदेडमधील मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार आहे. घाटीमधील तीन सदस्यीय चौकशी समिती नांदेडमध्ये येणार असून मृत्यूमागील कारणं शोधणार आहे. दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणावर शोक व्यक्त करत भाजपवर टीका केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram