Rahul Gandhi Nanded : राहुल गांधीची भारत जोडो यात्रा, महाराष्ट्रात VIP सुविधा : ABP Majha
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होतेय... तेलंगणातून ही यात्रा महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये दाखल होईल.संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही यात्रा नांदेडच्या देगलूर इथं दाखल होईल. देगलूरमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राहुल गांधी अभिवादन करतील. या ठिकाणी त्यांचं छोटेखानी भाषण होईल.. रात्री देगलूर ते वन्नाळी अशी मशाल यात्रा काढण्यात येणार आहे... या यात्रेच्या स्वागतासाठी काँग्रेस नेत्यांनी जय्यत तयारी केलीय.. दरम्यान या यात्रेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत साशंकता आहे..