Rahul Gandhi helps Students : राहुल गांधींकडून मुलांना लॅपटॉप भेट, यात्रेत मुलांशी चर्चा
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी अनेकांना भेटत आहेत.. त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत.. यादरम्यान काल राहुल गांधी यांनी सर्वेश हातने आणि चंद्रकांत किरकन या दोन लहान मुलांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेतले होते.. यावेळी एकाने सॉफ्टवेअर इंजिनियर तर दुसऱ्याने डॉक्टर होण्याचं स्वप्न राहुल गांधींना सांगितलं होतं.. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते लॅपटॉप घेऊ शकत नाहीत तसंच शाळेतही संगणक नसल्याचे त्यांनी सांगितलेलं...यानंतर काल सर्वेश हातनेला आणि आज चंद्रकांत किरकन या दहावीतल्या विद्यार्थ्याला राहुल गांधींकडून लॅपटॉप देण्यात आलाय..