Nanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं अपहरण करुन बोट छाटलं

Continues below advertisement

 नेत्याच्या विरोधात फेसबुक पोस्ट टाकण्याच्या कारणावरून उद्धव ठाकरे गटाच्या लोहा येथील उपशहरप्रमुखाचे अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. नांदेडमध्ये हा प्रकार घडला. भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे गटाचे लोहा येथील उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. या पोस्टमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुप्पा येथून काल रात्री वडवळे यांचे अपहरण केले. एका फार्महाऊस वर नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. मारहाणीत त्यांचे एक बोट छाटल्या गेले. दारूची बॉटल डोक्यावर ठेऊन वडवळे यांना नाचायला लावले. त्यांना पोस्ट बद्दल माफी मागायला लावली. आणि नंतर आणून एक रुग्णालयात टाकून देऊन आरोपी पसार झाले असा आरोप जखमीची आई आणि भावाने केला. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान मतदारसंघात चिखलीकर यांची दादागीरी वाढली .. आरोपीना अटक केली नाही तर लोहा - कंधार बंद करण्याचा इशारा शिवसेना उबाठा गटाकडून देण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram