Nanded : विहिरीवर पाणी भरत असलेल्या महिलेला वानराने दिलं विहरीत ढकलून ABP Majha
नांदेडच्या किनवट तालुक्यातील नांदगावात एक धक्कादायक घटना घडली. विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वानरानं चक्क विहिरीत ढकललंय. या घटनेत ही महिला किरकोळ जखमी झालेय. या महिलेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत... मात्र या घटनेनं गावात भीतीचं वातावरण आहे.. गेले काह दिवसांपासून किनवट परिसरात वानरांचा मोठा उच्छाद आहे. वारंवार तक्रार करूनही वन विभाग दुर्लक्ष करत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलेय.