Nanded Crime : आपल्यावर हसला म्हणून फळविक्रेत्यानं तरुणाचे हात छाटले, भाग्यनगरमधली धक्कादायक घटना
रागाच्या भरात हल्ली अतिशय भयावह आणि निर्घृण गुन्हे घडतायेत.. नांदेडची घटना तर थरकाप उडवणारी आहे. केवळ आपल्यावर हसला म्हणून एका फळ विक्रेत्यानं तरुणाचे दोन्ही हात छाटले. नांदेडच्या भाग्यनगर परिसरात बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असं हात गमावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर मोहम्मद तौहीद हा आरोपी फरार आहे.