Amit Deshmukh Nanded : दुचाकीवरून अमित देशमुखांकडून पूरस्थितीची पाहणी

Amit Deshmukh Nanded : दुचाकीवरून अमित देशमुखांकडून पूरस्थितीची पाहणी 

माजी मंत्री अमित देशमुख यांनी आज नांदेड शहरात पुरग्रस्त भागाची पाहणी केली . दुचाकीवरून फिरून त्यांनी सखल भागात पाहणी केली .. पूरग्रस्त नागरीकांशी त्यांनी संवाद साधला .. गोदावरी नदीला पूर आल्याने नांदेड शहरातील नदीकाठच्या भागात अजूनही पाणी साचलेले आहे . अनेकांच्या घरात मोठया प्रमाणात पाणी साचून नुकसान झाले . हजारो नागरिकांचे संसार उघड्यावर पडले .. याभागात जाऊन अमित देशमुख यांनी पाहणी करुन नागरिकांना दिलासा दिला .. पूरग्रस्त भागाचे शासनाने तातडीनं पंचनामे करावे . लोकांचे खूप मोठे नुकसान झाले .. पावसामुळे रोजगार देखील बुडाला ,उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला .. 2005 साली राज्य शासनानें पुरग्रस्तांना घरटी पाच हजार रूपये मदत दिली होती . आता राज्य सरकारने घरटी 25 हजार रूपये मदत देण्याची मागणी अमित देशमुख यांनी केली .. दरम्यान पुर आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीपिकांचे देखील नुकसान झाले . त्याचे पंचनामे शासनाने करावे .. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी काँगेस पक्षा कडून राज्य सरकारकडे सविस्तर निवेदन दिले जाणार असल्याचे अमित देशमुख म्हणाले ...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola