
हायकोर्टाचा आदेश आला आणि 100 रेमडेसिवीर पोहोचले; नागपूर खंडपीठात रात्रीच्या सुनावणीत काय घडलं?
Continues below advertisement
नागपूर : नागपूर आणि विदर्भाला रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा असमान वाटप होत असल्याच्या सुमोटो याचिकेवर बुधवारी (21 एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चक्क रात्री सुनावणी घेतली. रात्री 8 वाजता सुरु झालेली सुनावणी ही रात्री जवळपास 10.30 वाजेपर्यंत सुरु होती. या सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्य आणि उपराजधानीसाठी अत्यंत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या याचिकेवर आता 23 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.
Continues below advertisement