ABP News

देशाच्या कामी येतोय, सैनिकासारखं वाटतंय; कोवॅक्सिन लसीची चाचणी घेणाऱ्या स्वयंसेवकांची भावना

Continues below advertisement
नागपूरच्या गिल्लूरकर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सिनची मानवी चाचणी सुरु झाली आहे. डॉ चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या देखरेखीत आरोग्य तपासणीतून निवडलेल्या स्वयंसेवकांना ही लस दिली जात आहे. ज्या स्वयंसेवकाना ही कोवॅक्सिन ही देण्यात आली आहे तेही या प्रक्रियेत सहभागी होऊन आनंदित आहेत. आम्ही देशाच्या कामी येत आहोत, एका सैनिकासारखे वाटत असल्याची भावना या स्वयंसेवकांनी व्यक्त केली आहे.
या चाचणीत सहभागी झालेले दोन स्वयंसेवक एबीपी माझाशी संवाद साधताना म्हणाले की, "सखोल आरोग्य चाचणीतून या बहुप्रतिक्षित कोवॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीसाठी आमची निवड झाल्यामुळे आनंद होत आहे. देशाच्या कामी येत आहोत, एका सैनिकासारखे वाटत आहे. भारताचा सैनिक देशासाठी काय करतो अशीच भावना आज मनात आहे. तसंच आम्हाला कोणतंही खास पथ्य पाळण्यास सांगितलेलं नाही. त्यामुळे आम्ही सामान्य आयुष्य जगू शकतो आहे. केवळ कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सांगितलेले नियम पाळायचे आहेत."
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram