मिनी मेट्रोचं 'विदर्भ सर्किट'; प्रमुख शहरांना नागपूरशी मिनी मेट्रोनं जोडणार, नितीन गडकरींची घोषणा
Continues below advertisement
Nagpur Metro : विदर्भातील शहरं नागपूरशी मेट्रोनं जोडणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली आहे. पुढील दीड वर्षांत मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरं जोडण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली आहे. ते अमरावती येथे एका महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
Continues below advertisement