Nagpur Weather Update : विदर्भ आणि मराठवाड्याला गारपीट आणि अवकाळी पावसानं झोडपलंय : ABP Majha
विदर्भ आणि मराठवाड्याला गारपीट आणि अवकाळी पावसानं झोडपलंय... काल संध्याकाळी नागपूर ग्रामीण, हिंगणा, कुही, भिवापूर, मौदा, कळमेश्वर या तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कापसाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.. नागपूर जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यात कापसाचं पीक घेतलं जात... सध्या सर्वच ठिकाणी शेतातील कापूस वेचणीवर आला होता.. काही ठिकाणी वेचणी सुरूही झाली होती.. पण आता सर्व कापूस भिजला असून आता त्याची वेचणीही शक्य नाही आणि विक्री ही शक्य नाही.. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान झाला आहे...