Uddhav Thackeray Full PC Nagpur:बाप चोरणारे,पक्ष चोरणारे आता RSS वरही दावा सांगतील,Shindeवर हल्लाबोल

मुंबई:  दोन दिवसांमध्ये चार मंत्र्यांवर जोरदार आरोप झाले. अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला आहे. राजीनाम्यांच्या मागण्या झाल्या. विरोधकांनी सभागृहाबाहेरही आंदोलनं केली.परंतु अद्याप एकाही मंत्र्याचा राजीनमा घेतल नाही. प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने राजीनामे घेतले पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.  तसेच आरोप झाल्यानंतर क्लिनचिट देण्याचं काम करणार का हा  सवाल देखील उद्धव ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला.  

मिंदे गट काल शिवसेना कार्यालयात गेले होते. आज आरएसएस कार्यालयात गेले. आरएसएस कार्यालयात देखील  तिथेही ते ताबा सांगायला गेले होते का? सध्या दुसऱ्यांचे मंत्री, पक्ष आणि कार्यालय चोरण्याचा महाराष्ट्रात प्रकार सुरू आहे. हा प्रकार पाहून महाराष्ट्रात टोळीचे राज्य आले का अशी भावना जनमानसात आहे. शिंदेची वृत्ती घाणेरडी असून आरएसएसने काळजी घ्यावी. भागवतांनी  देखील कार्यालयात कुठे लिंबू टाकलं का पाहावे,  नाव न घेता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला दिला आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola