Nagpur : नागपूरात चौकीदाराचा मृत्य, रात्री पेटवलेली शेकोटी जीवावर बेतल्याचा संशय
Continues below advertisement
सध्या अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडली असून अनेक जण शेकोटीचा आधार घेताना दिसताहेत. मात्र ही शेकोटी नागपुरातल्या गोरेवाडा वनक्षेत्रातील चौकीदाराच्या जीवावर बेतल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. गोरेगाव वनक्षेत्रातील गेट नंबर चारवर, रात्रपाळीसाठी आलेल्या 40 वर्षीय रवींद्र काळबांडे यांचा शेकोटीजवळ अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. तसंच त्यांच्या चौकीतील बरचसं साहित्यही जळालं आहे. त्यामुळं शेकोटीच्या धुरामुळं गुदमरुन किंवा भाजल्यानं काळबांडेंचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Continues below advertisement