Nagpur : धक्कादायक! नागपुरातल्या वेश्या वस्तीमध्ये छुपे भुयार, अल्पवयीन मुलींचं मानसिक खच्चीकरण
नागपुरातल्या वेश्या वस्तीमध्ये छुपे भुयार असल्याचं समोर आलं आहे. एका 14 वर्षीय मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी इथं छापेमारी केली. यानंतर अल्पवयीन मुलींना तळघरात लपवलं जात असल्याचं समोर आलं असून खरेदी करुन आणलेल्या अल्पवयीन मुलींना देहविक्रीच्या चिखलात उतरवण्यासाठी आणि त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी या तळघरात कोंडलंही जात होतं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.