Nagpur : शरद पवार नागपुरात दाखल, पोलिसांचा चोख बंदोबस्त; घरावरील हल्ल्यानंतर विशेष खबरदारी

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नागपुरात दाखल होत असून विमानतळावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.. दोन दिवसापूर्वी मुंबईत पवारांच्या सिल्वर ओक या निवास स्थानापर्यंत एसटी कर्मचारी आंदोलन करत गेले होते... त्या ठिकाणी झालेली दगडफेक आणि आक्रमक आंदोलन पाहता नागपूरात विमानतळावर कुठलीही अप्रिय घटना होऊ नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे... मोठ्या प्रमाणात बॅरिकॅडींग करण्यात आली असून नेहमीच्या तुलनेत जास्त पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.. डॉग स्कॉड आणि बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आलेला आहे... जोन वनचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुमारे शंभर कर्मचारी आणि अधिकारी शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी विमानतळावर तैनात करण्यात आले आहेत... शिवाय नागपूर ते अमरावती रस्त्यावरही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून एसटी कर्मचाऱ्यांचा कुठलाही गट आंदोलन करणार नाही... शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेला तडा जाणार नाही... यासाठी पोलिसांनी खास नियोजन केल्याचेही मतानी म्हणाले...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram