Nagpur Lok Sabha 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचा नितीन गडकरींवर हल्लाबोल
बातमी आहे नागपूरमधून. आगामी लोकसभा निवडणूकींच्या अनुशंगाने भाजपाचे उमेदवार नितीन गडकरींवर काँग्रेस नेते विलास मुत्तेवारांनी जोरदार टीका केलीये पाच लाख मतांनी निवडून येऊ हा गडकरींचा अहंकार असून, हाच अहंकार त्यांचा पराभव करेल अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी केलीय. तर गडकरींनी केलेल्या कोट्यवधींच्या कामामुळेच नागपुरात महापूर आला अशी टोलबाजी ही मुत्तेमवार यांनी केलीय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी.