Nagpur Jail | नागपूर तुरुंगात गुन्हेगारासाठी बुटातून चरस नेणारा सुरक्षारक्षक निलंबित
Continues below advertisement
नागपूरमधील केंद्रीय कारागृहात एका पोलीस सुरक्षा रक्षकानंच अमली पदार्थांचा पुरवठा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली. ज्यानंतर सदर प्रकरणाचा तपास करण्यात आला. ज्यामध्ये हा सुरक्षा रक्षक दोषी असल्याचं आढळून आलं. परिणामी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलं होतं. पायातील जोड्यांमध्ये तुरुंगात चरस घेऊन जाणाऱ्या 28 वर्षीय सुरक्षा रक्षक सोळंकीला निलंबित करण्यात आलं. पण, यानिमित्तानं गुन्हेगारांना अटकाव घालणाऱ्या या कारागृहात घडणारा धक्कादायक प्रकार समोर आला.
Continues below advertisement