Sana Khan Case Update : मृतदेह ती द्या हो! आईचा टाहो, 26 दिवसांनंतरही सना खान यांच्या मृतदेहाचा शोध नाही
Continues below advertisement
सना खान यांची हत्या होऊन २६ दिवस झालेत. अजूनही त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. जबलपूरला गेलेल्या सना खान परत आल्याच नाहीत. त्यामुळे काहीही करा, पण माझ्या मुलीचा मृतदेह मिळवून द्या, अशी विनवणी सना खान यांच्या आई मेहेरूनिस्सा खान यांनी नागपूर पोलिसांना केलीय. त्याचवेळी यातील मुख्य आरोपी अमित साहूची नार्कोटेस्ट करा, म्हणजे सत्य बाहेर येईल, अशीही मागणी त्यांनी केलीय. दरम्यान, अमित साहूच्या नार्कोटेस्टच्या मागणीसाठी पोलिसांनीही कोर्टात अर्ज दाखल केलाय. त्यामुळे अमित साहूची नार्कोटेस्ट होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Continues below advertisement
Tags :
Plea Mother Body Sana Khan Jabalpur Murder Nagpur Amit Sahu Girl's Body Mehrunissa Khan Narcotest