Samruddhi Mahamarg वर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर

समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करण्यात येतोय.. म्हणजेच, एखाद्या कारनं समृद्धी महामार्गावर कधी प्रवेश केला, आणि एक्झिट कधी केलं, यामधला वेळ मोजला जातो, आणि या वेळेत किती अंतर पार केलं हे पाहिलं जातं. यावरून कारचा सरासरी वेग काढण्यात येतो. तो वेग जर ताशी १२० किमीहून जास्त असेल, तर एक्झिट पॉईंटवर वाहन चालकाचं २० मिनिटं उद्बोधन केलं जातं. नागपूर, जालना, वेरूळ व कारंजा लाड या चार ठिकाणी परिवहन विभागाचे पथक एक्सिट मॅनेजमेंट सिस्टीमवर काम करत आहे. कालपासून ही विशेष मोहीम सुरु झाली असून या मोहिमेत आतापर्यंत 54 वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर 52 वाहनांच्या टायरची स्थिती कमकुवत असल्याने त्यांना समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola