Rohit Pawar Shinde - Fadnavis Flex: एकनाथ शिंदेंपेक्षा फडणवीसांचा फ्लेक्स मोठा,रोहित पवार म्हणतात...
नागपुरात अधिवेशन चालू होऊन जवळपास दहा दिवस उलटलेत. या दहा दिवसांमध्ये सध्या एक चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. ती म्हणजे सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या विधान भवनाच्या गेट समोरचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फ्लेक्स... एरवी नॉर्मल वाटणारा हा फ्लेक्स जर थोडसं बारकाव्यांने पाहिला तर एकनाथ शिंदे यांचा फ्लेक्स छोटा असल्याचं आणि देवेंद्र फडणवीस यांचा फ्लेक्स मोठा असल्याचं पाहायला मिळतंय..याबाबत सर्वसामान्यांसोबतच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी