Remdesivir : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, मात्र नागरिकांनी घाबरू नये : डॉ. अशोक अरबट

रेमडेसिवीर इंजेक्शन गंभीर स्थितीत असलेल्या कोरोनाबाधितांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. सध्या तरी अँटी व्हायरल इंजेक्शन म्हणून हेच इंजेक्शन सर्वात उपयोगी ठरतंय आणि त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण ही वाचले असल्याचे मत सिनियर पलमेनॉलॉजिस्ट डॉ अशोक अरबट यांनी व्यक्त केले आहे. मात्र, लोकांनी रेमडेसिवीर मिळत नसल्यामुळे घाबरून जाऊ नये. दुकानाबाहेर गर्दी करू नये. सरकार लवकरच हे इंजेक्शन कुठून तरी मिळवून रुग्णालयांना उपलब्ध करून देईल आणि रुग्णालय रेमडेसिवीर आवश्यक असलेल्या रुग्णांचा त्याद्वारे उपचार करेल असे मत ही डॉ अरबट यांनी व्यक्त केले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola