Nagpur : नागपुरात Indian Science Congress चं उद्घाटन, PM Modi या सोहळ्यात व्हर्चुअली सहभागी होणार
भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन आज नागपुरात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटन सोहळ्यात व्हर्चुअली सहभागी होणार आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री नरेंद्र सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण तसेच विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान असा यंदाच्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा विषय आहे.