Diwali 2021 : नागपूरच्या महावीर कॉलनीत प्रदुषणमुक्त दिवाळीची संकल्पना, पर्यावरण रक्षणाची घेतली शपथ
नागपूरच्या महावीर कॉलनीमधील मुलांनी पर्यावरण रक्षणची शपथ घेतली आहे. फटाके फोडल्याने पर्यावरणाला हानी पोहचते आणि फटाक्यांमधील केमिकलमुळे अनेक श्वसनाचे आजार होतात व ध्वनी प्रदूषणही होतं. तसंच अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे हे सर्व धोके टाळत पर्यवरणाचं रक्षण करण्याच्या उद्दिष्टाने महावीर कॉलनीमधील नागरिकांनी पुढाकार घेतला. या सर्वांनी एकत्र येत यंदा दिवाळीत फटाके न फोडण्याची शपथ घेतली, विशेष म्हणजे यात लहान मुलांसह मोठ्यांनीही सहभाग घेतला.
Tags :
Diwali Diwali 2021 Diwali Pollution Nagpur Diwali Pollution Free Diwali Nagpur Mahavir Colony