Nagpur Lockdown & #Corona Update संचारबंदी असूनही नागपूरकर बिनधास्त रस्त्यावर, कोरोनाची भीती नाही?
आज आणि उद्या नागपूरमध्ये दोन दिवसांचे बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने बाजारपेठ बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे. बाजारातील सर्व दुकाने, सर्व हॉटेल, रेस्टोरेंट, सर्व सरकारी व खाजगी कार्यालय बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवा - दूध, भाजीपाला, पेट्रोल, औषध ह्या दुकानांना नियमात राहून उघडे राहण्याची परवानगी राहणार आहे. स्वतंत्र प्रवेश असलेली किराणा दुकानं सुरू राहू शकतील. मात्र, शॉपिंग कॉम्प्लेक्समधील किराणा दुकान असल्यास बंद ठेवावे लागेल. नागरिकांनी कारणाशिवाय बाहेर येऊ नये असे आवाहन आहे, मात्र सक्ती नाही.